मोबाईल मेडिकल यूनिटचे संजना सावंत यानी केले लोकार्पण

केंद्र शासनाने सिंधूदुर्ग जिल्ह्यासाठी करून दिली उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी ता ०२ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अति ग्रामीण भागासाठी केंद्र शासनाच्या मोबाईल मेडीकल युनिट योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या मोबाईल युनिटचे आज संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण भागासाठी मोबाईल मेडीकल युनिट सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावे दुर्गम अतिदुर्गम भागात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची देखील या योजनेमध्ये निवड करण्यात आली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत डिस्पेंसरी व्हॅन व बोलेरो प्राप्त झाली त्याचे लोकार्पण आज २ जून पासून दुर्गम अति दुर्गम भागासाठी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन भिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे उपस्थित होते. अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते नारळ वाढवून गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. या दोन गाड्या ४८ गावांमध्ये एका महिन्या मध्ये जाणार आहेत. तसेच या गाड्या २४ दिवस कार्यरत राहणार असून दिवसाला दोन गावांना भेट देणार आहेत. या मोबाईल युनिट पथकामध्ये डॉक्टर, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट व ए एन एम तसेच दोन वाहन चालक यांचा समावेश आहे. नियोजित गावांमध्ये जाऊन कोणत्याही आजारावर मोफत औषधोपचार देणार आहेत. या वाहनांमध्ये एक्स-रे मशीन, डोळे तपासणी मशीन व गरोदर मातांची काळजी घेणे यासंदर्भात सर्व उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संजना सावंत व मुकाअ प्राजीत नायर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page