तालुक्यात मान्सून पूर्व शेतीच्या कामांना वेग

शेतकरी नांगरणी , भात पेरणीच्या कामांना व्यस्त

*💫सावंतवाडी दि.०२-:* मळगाव परिसरात मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.दोन आठवड्यापूर्वी मे महिन्यात वादळासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच ओलावा निर्माण झाला होता. त्यानंतरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शेळ जमिनिसह भरडी जमिनीतही पूर्णतः ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॅक्टरच्या सहाय्याने मान्सूनपूर्व नागरणीस व भात पेरणीस सुरुवात केली आहे. आता भात पेरणी केल्याने मान्सूनच्या पावसास सुरुवात होताच लावणीस सुरुवात करणार असल्याने शेतकऱ्यांनी जोर धरला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती पद्धतीची कास सोडून शेतकऱ्यांचा कल आधुनिक श्री पद्धत शेतीकडे वळला आहे. काही ठिकाणी पेरणी चालू आहे, तर काही ठिकाणी पेरणी पूर्ण झाली असून तरवायोग्य भाताचे रोप झाले आहे.

You cannot copy content of this page