Headlines

घे भरारी फाउंडेशनतर्फे केसरी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती ठरली आकर्षण; विविध गावांतील नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ..

⚡सावंतवाडी ता.२२-: घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने केसरी येथील ग्लोबल एक्वेरियममध्ये नुकतेच भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून माडखोल, केसरी, ओवळीये, देवसु, पारपोली, सावंतवाडी, धवडकी आदी गावांतील अनेक नागरिकांनी विविध आजारांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती. यामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत, जनरल फिजिशियन डॉ. सतीश सावंत, दंतचिकित्सक डॉ. विनय सूर्यवंशी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत चितारी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नेहा सावंत, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अवधूत निखिल, भूलतज्ज्ञ डॉ. विनोद कांगुले तसेच डॉ. माधवी कशाळीकर यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्लोबल एक्वेरियमचे व्यवस्थापक रमेश राऊळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रक्त तपासणीसाठी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथील सेजल आयरेकर, सिंथिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल घे भरारी फाउंडेशनतर्फे जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्लोबल एक्वेरियम व्यवस्थापनाचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्ष, उपाध्यक्ष मेघना राऊळ, कार्याध्यक्ष रिया रेडीज, सचिव मेघा दुबळे, खजिनदार मेघना साळगावकर तसेच गीता सावंत, संध्या पवार, मनीषा नवांगुळ, स्वप्नाली कारेकर, मनीषा मिशाळ, रेखा कुमटेकर, अरुणा नाईक, दीपा नेवगी, सीमा रेडीज यांच्यासह फाउंडेशनच्या अनेक सभासद उपस्थित होत्या.
घे भरारी फाउंडेशनतर्फे समाजोपयोगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात असून या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page