गर्भवती महिला, पोलिस कर्मचारी यांच्यासह अल्पवयीन मुलांचा समावेश
*💫सावंतवाडी दि.३१-:* शहरात पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये आज एका पोलिस कर्मचाऱ्यासह एक गर्भवती महिला आणि अल्पवयीन मुले असे एकूण ७ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहेत. यामध्ये एक तीन वर्षाचे बाळ असून, एक अकरा वर्षाचे मुल आहे. आज एकूण ७५ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. अशी माहिती डॉ उमेश मसुरकर यांनी दिली आहे. सावंतवाडी शहरातील बाजारपेठेमध्ये आज अकरा वाजेपर्यंत हाउसफुल्ल गर्दी झाली होती या हाऊसफुल्ल गर्दीत नगरपरिषद प्रशासनाने रॅपिड टेस्ट घेतली यामध्ये आढळून आलेले तीन वर्षाचे बाळ हे बालरोग तज्ज्ञांकडे आले उपचारादरम्यान आले होते, मात्र त्या बाळाला कोरोनाची लक्षणे असल्याने संबधित डाॅक्टरनेच त्या बाळाची रॅपिड टेस्ट करण्यासाठी तिच्या आईवडिलांना पाठविले असता ते बाळ पाॅझिटीव्ह आले. मात्र आईवडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. संबधित बाळ हे कणकवली कसवण येथील असुन त्याच्यावर शासनाच्या गाईड लाईन नुसार खासगी हास्पीटल व उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार केले जाऊ शकतात तर अकरा वर्षाचा आढळलेला बाळ हा वेंगुर्ला येथील आहे त्याचे वडीलही कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे डाॅ.मसुरकर यांनी सांगितले. रॅपिड टेस्ट मध्ये सावंतवाडी शहरासह आंबोली अशा ग्रामीण भागातील लोक देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत. सावंतवाडी पोलीस ठाण्याचा वाहनावर असणारा कर्मचारी पाॅझिटीव्ह आढळला असून त्याला लक्षणे जाणवल्याने त्याने स्वतःच आपली टेस्ट केली असता तो पाॅझिटीव्ह आला. मात्र त्याच्यासोबत वावरणार्या इतर पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असून त्यांची उद्या रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे.
