‘ एक पुष्प… कृतज्ञतेचे’ अभियानाअंतर्गत करणार महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

*मनसे कडून राबवला जात आहे उपक्रम; तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती*

*💫कुडाळ दि.३१-:* तौक्ते चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर जिल्ह्यात गंभीर परिस्थितीत निर्माण झाली होती. यामध्ये महावितरण विभागाचे फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परंतु, या परस्थितीला तोंड देत येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून कर्तव्यनिष्ठ दाखवत काम करून, सर्व परिस्थितीत पूर्वपदावर आणत जनतेला दिलासा दिला आहे. ही बाब कौतुकास्पद असून, त्यांच्या या कार्यामुळे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ एक पुष्प… कृतज्ञतेचे ‘ हे अभियान राबवणार आहे. या अभियानाची सुरुवात कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, उप तालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकाऱ्यांनी महावितरण पण दूर सेक्शन ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला आहे. हा उपक्रम मनसे तर्फे सर्वत्र राबवला जाणार आहे. तसेच यावेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत मनसे शिष्टमंडळ महावितरणचे अधीक्षक यांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहे. याबाबतची माहिती मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page