४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक…

बांदा ग्रामपंचायतचा निर्णय : अक्रम खान यांनी दिली माहिती

*💫बांदा दि.३०-:* बांदा शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असून त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे बांदा शहरातील ४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. शहरातील ४५ वर्षावरील जे नागरिक लसीकरण करणार नाही किंवा टाळाटाळ करेल त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही शासकीय दाखला देण्यात येणार नाही, अशी माहिती सरपंच अक्रम खान यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात बांदा शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आता ग्रामपंचायत प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी आवाहन करूनही लोक लसीकरणासाठी महत्व देत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ४५ वर्षेवरील सर्वांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून शहरातील ४५ वर्षेवरील वयोगटाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांना यापुढे कोणत्याही योजनेसाठी किंवा वयक्तिक कारणासाठी शासकीय दाखले न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले.

You cannot copy content of this page