ह्यूमन राइट्सच्या महासचिव अमित वेंगुर्लेकर यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकसंख्येच्या तुलनेत रेड झोन मध्ये असून, महाराष्ट्रात सर्वोच्च रुग्ण संख्या आणि मृत्यू दर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जी सरासरी लोकशाही संख्या साडे आठ लाख आहे. साडे आठ लाख लोकसंख्या असलेल्या पनवेल महानगर पालिकेचे जितके दिवसाचे आकडे आहेत. तेवढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे आकडे आहेत. विशेष म्हणजे सिंधदुर्ग जिल्ह्यात विरळ घरे असून सुद्धा कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे. यासाठी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी रुग्ण संख्या अल्प प्रमाणात आहे अशा जिल्ह्यातील लसीकरण मोहीम तत्काळ थांबवून त्या सर्व लसी एकच वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हस्तांतरीत करून वयोगट, वर्गवारी व विभागणी करून तातडीने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात यावे. अशी मागणी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये घोषित असल्याने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी तथा आपत्कालीन प्रमुख यांचेकडून वाढत्या रुग्ण संख्या व मृत्यूदराचा अहवाल मुख्यमंत्री यांना सादर करून महाराष्ट्र शासनाने निर्मित केलेले विविध डॉक्टरांचे टास्क फोर्स तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर आणि तज्ञ डॉक्टर यांचे विविध पथके सिंधुदुर्ग जिल्ह्यात तातडीने उपलब्ध करून द्यावेत आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्राण वाचवावेत यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर होईल. अशी मागणी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन देत प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
