⚡सावंतवाडी ता.०८-: ओवळीये येथील सरपंच मा. सौ. तारामती चंद्रकांत नाईक व ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. चंद्रकांत कृष्णा नाईक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या पक्षप्रवेशासाठी मा. श्री. हनुमंत मधुकर सावंत व प्रकाश आत्माराम सावंत यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. संदीपजी गावडे, जिल्हा सरचिटणीस मा. श्री. महेशजी सारंग, जिल्हा बँक संचालक मा. श्री. रवींद्र मडगांवकर, उपसरपंच सौ. मनस्वी सावंत, ग्रा. सदस्य सौ. श्वेता सावंत, प्रिया सावंत, माजी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डेगवे येथील मधुसूदन देसाई, शक्तिकेंद्रप्रमुख राजन राणे, गेळे सरपंच सागर ढोकरे, बूथप्रमुख सागर सावंत, हनुमंत सावंत, मनोज सावंत, गावप्रमुख सदानंद सावंत, जगन्नाथ सावंत, रत्नदीप सावंत, सुप्रिया राऊळ, भिवा सावंत, प्रकाश आत्माराम सावंत, मोहन सावंत, चंद्रकांत राऊळ, वेर्ले बूथप्रमुख प्रसाद गावडे, सुभाष राऊळ आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण असून विकसित ओवळीयेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
