⚡देवगड ता.०८-: देवगड जामसंडे नगरपंचायत सभेत तोडपाणी आरोप चांगलाच गाजला.या आरोपावरून सभेतच वादळ निर्माण झाले.भाजपाचे दोन नगरसेवक या आरोपावरूनच एकमेकांमध्ये भिडले.भाजपा नगरसेवक चंद्रकांत कावले हे दुसèया सभेत पुन्हा वरचढ ठरले.त्यांनी गेल्या सभेत केलेल्या गंभीर आरोपांनंतर या सभेतही तोडपाणी झाल्याचा केलेला गंभीर आरोप सभेसाठी वादळी ठरला.
देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी बांधकाम सभापती शरद ठुकरूल, पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे तसेच नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, विशाल मांजरेकर,तेजस मामघाडी, नितीन बांदेकर, सौ.रूचाली पाटकर,सौ.तन्वी चांदोस्कर, सौ.अरूणा पाटकर, मनिषा घाडी, मनिषा जामसंडेकर, स्वरा कावले, सुधीर तांबे, चंदकांत कावले आदी नगरसेवक उपस्थित होते.
नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी मागील सभेत उपस्थित केलेल्या जामसंडे येथील प्रभाग ४ मधील पुलाचा कामाचा प्रश्न उपस्थित केला.प्रभाग ४ मधील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले याबाबत रितसर तक्रार दिलेली होती.त्याबाबतचे पुरावे देखील सादर केलेले असताना सदर तक्रार नगरपंचायतीला प्राप्त झालेली नाही असे मागील सभेत न.पं.ने सांगीतले होते मात्र या सभेत आपण केलेला तक्रार अर्ज सापडल्याचे सांगत असून केवळ ठेकेदाराचे बील काढण्यासाठी आपली तक्रार मिळत नसल्याचे कारण सांगीतले असा आरोप यावेळी कावले यांनी केला.तसेच ठेकेदाराचे बील काढण्यासाठी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी मोठी तोडपाणी केली असा गंभीर आरोप कावले यांंनी केला.या सर्व प्रकरणाची बांधकाम सभापती यांनी चौकशी करावी अशी मागणी यावेळी केली मात्र ही मागणी करतानाच कावले यांनी चौकशी करतानाही तोडपाणी करू नये असा आरोप केला यावर बांधकाम सभापती शरद ठुकरूल हे संतप्त झाले आणि तोडपाणी यासारखे शब्द सभागृहात वापरू नका.चौकशी होण्यापुर्वीच खोटे आरोप करीत आहात हे सभाशास्त्रात बसत नाही.चौकशी मागणी करीत आहात यापुर्वी बांधकाम सभापती म्हणून तुम्ही माझाकडे का तक्रार दिली नाहीत.यावर कावले यांनी आपण सभापतींवर आरोप केलेले नाहीत तर अधिकाèयांवर आरोप करत असल्याचे सांगीतले.
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नगरपंचायत मालकीच्या लघुनळयोजनेच्या विषयावर चर्चा झाली.यावेळी संबंधित कर्मचारी यांनी लघुनळयोजनेचे उत्पन्न कमी मात्र खर्च जास्त अशी सद्यस्थिती आहे यामुळे लघुनळयोजना चालविणे संबंधितांना अशक्य झाले आहे असे सभागृहात सांगीतले यावेळी त्यांचे हस्तांतरण करा मात्र दरवाढ करू नका अशी सुचना नगरसेवकांनी केली.
जामसंडे येथे पंतप्रधान घरकूल आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधणीचे काम २०१९ पासुन सुरू होते ते नंतर तीन चार वर्षे बंद होते.या कामाची पाहणी करण्यासाठीर खंडेलवाल समिती एप्रिल २०२२ मध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी येवून पाहणी करून त्यांनी अहवाल नगरपंचायतीला दिला यामध्ये अनेक दोष दाखविण्यात आले आणि सदर काम निकृष्ट झालेले असून ते सर्व काम पाडून नवीन काम करण्यात यावे व नियमाप्रमाणे काम न केल्यामुळे संबंधित कंपनीला ९५ लाख दंडाची कारवाई करावी व हा अहवाल टीपीक्युएम् एजन्सीकडे पाठविण्यात यावा असे नमुद करण्यात आले होते मात्र सदर एजन्सीने सर्व काम समाधानकारक असून नियमाप्रमाणे काम सुरू आहे असा अहवाल देवून एकप्रकारे संबंधित कंपनीला क्लीनचीट दिली.सध्या पुर्वीप्रमाणेच काम सुरू केले असून बांधत असलेली इमारत मजबुत नाही.भविष्यात काही घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला.संबंधित ठेकेदाराचे आतापर्यंत १५ टक्केच काम झाले आहे मात्र २८ टक्के रक्कम अदा केली आहे असा आरोप बांदेकर यांनी केला.
देवगड न.पं.क्षेत्रातील खुल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमणे करून हजारो रूपये भाडी आकारली जातात.खुले क्षेत्र नगरपंचायतीचा मालकीचे असताना दुसरे त्याच्यावर अतिक्रमण करून भाडी घेत आहेत त्यांना नोटीस केव्हा काढणार असा प्रश्न नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला.सांडपाण्याबाबत एक महिन्यापुर्वी तक्रार आल्यावर न.पं.प्रशासन त्यावर झटकन कारवाई करून संबंधितांना ५ हजार रूपये दंड ठोठावते मात्र गेली तीन वर्षे सांडपाणी सोडणार्यांवर अशी कारवाई का केली नाही असा सवाल संतोष तारी यांनी विचारला.न.पं.क्षेत्रात गटारांमध्ये बारमाही सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा अशी सुचना बांदेकर यांनी केली.
