सेवांगणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिकेचे प्रकाशन..
⚡मालवण ता.०८-:
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संकलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचे वितरण जिल्ह्यातील ४ हजार विद्यार्थ्यांना करण्यात येणार असून पुस्तिकेवर आधारित आधारित प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, तालुका अध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टाचे पदाधिकारी दीपक भोगटे , बापू तळवडेकर, शोभा म्हाडगुत, श्रीधर गोंधळी, मधु वालावलेकर समाजसेवक पुरस्कार प्राप्त विद्या चिंदरकर, संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, सचिव योगेश वराडकर, प्रचार व पर्यटन सचिव संग्राम कासले, सचिन कासले, हिशोब तपासणीस शंकर कदम, कार्यालयीन सचिव मनोज काळसेकर, तालुका महिला सरचिटणीस समता डिकवलकर, संघटक भरत पेंडूरकर, गाव शाखा तळगाव अध्यक्ष संदीप तळगावकर, गाव शाखा कुणकवळे अध्यक्ष संदीप कदम, गाव शाखा वडाचापाट अध्यक्ष गणेश कासले, गावशाखा डिकवल सचिव सदानंद डिकवलकर महिला संघटक सानिका कदम, पौर्णिमा कासले, इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी बेस्ट नाथ पै सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राची ओळख मुलांना व्हावी यासाठी सेवांगणच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन चरित्राची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे.
या १५० प्रश्नोतरे असणाऱ्या पुस्तकावर आधारीत स्पर्धा घेण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. गुणवंत विद्यार्थी यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात येणार आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात येणार असून चार हजार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी प्रविष्ठ करण्यात येणार आहे.
