⚡सावंतवाडी ता.१७-: तळवडे गडगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक ८ ला मुंबई स्थित ग्रामस्थ श बाबुराव उर्फ बंड्या दळवी व बंधू या कुटुंबीयांनी शाळेला मदतीचा हात देत ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य भेट दिले.
यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडावी यासाठी टीव्ही व टीव्हीसाठी शोकेस उपलब्ध करून देण्यात आले तसेच शालेय पोषण आहार खोलीच्या किचन शेड साठी आवश्यक पत्रे देऊन किचनशेड दुरुस्त करून दिली.
विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी योगदान दिले.दळवी बंधू कुटुंबीयांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर पडली असून विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांचा लाभ मिळणार आहे.ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करून दळवी बंधू कुटुंबीयांचे कौतुक केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामस्थ यांनी बाबुराव उर्फ बंड्या दळवी व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.त्यांच्या या योगदानामुळे इतर दानशूर व्यक्तींनाही शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळणार असून शिक्षणाबरोबरच शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी केलेले हे योगदान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयोगी ठरणार असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत यांनी व्यक्त केले.
