Headlines

सुवर्णपदकांची ‘हॅट्ट्रिक’ करणाऱ्या बांदयाच्या प्रेरणा भोसलेचा मराठा समाजातर्फे गौरव…

⚡सावंतवाडी ता.१७-: किक बॉक्सिंग,कराटे, बॉक्सिंग या तिन्ही क्रीडा प्रकारात विभाग,जिल्हा व राज्यस्तरावर सुवर्ण पदकांची ‘हॅट्ट्रिक’ करणाऱ्या बांदा येथील प्रेरणा भोसले हिचा सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्याहस्ते प्रेरणा भोसले हिला गौरविण्यात आले.
​या भव्य सोहळ्याला व्यासपीठावर शिवसेना आमदार निलेश राणे,आ. दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक संजू परब, वेंगुर्ले सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, संदीप कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात मराठा समाजातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page