⚡वेंगुर्ला ता.१३-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमित्त वेंगुर्ला येथे
भाजपच्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवां यांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.तसेच कमला एकादशीनिमित्त अरुण सावंत बुवांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेविका अँड. सुषमा खानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर कार्य करुन एक नवा विक्रम स्थापित केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे केंद्र सरकार हे सनातनी धर्माचे पुरस्कर्ते असल्याने ५०० वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिरांची उभारणी झाली .जगाच्या नकाशावर भारताचे विकसनशील स्थान अधोरेखित केले. ह्या एक तपामध्ये मोदी यांनी राष्ट्र प्रगतीपथावर नेले. तसेच हिंदुस्थान परम् वैभवशाली बनविण्यासाठी मोदी दिवस रात्र मेहनत घेत असल्याचे सांगितले. यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर, युवा मोर्चाचे नगरसेवक प्रणव वायंगणकर, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, प्रशांत आपटे, रविंद्र शिरसाट, सदानंद गिरप, नगरसेवक विनु मोर्डेकर, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, नगरसेवीका आकांक्षा परब, रिया केरकर, काजल कुबल, गौरी माईणकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, विनय गोगटे, नाना महाजन, किरण मेस्त्री, तसेच वारकरी संप्रदायाचे किशोर रेवंणकर, गजानन कुबल, दिलीप कुर्ले, सुभाष कुर्ले, रामकृष्ण डिचोलकर, सहदेव गिरप, अंकुश वराडकर, गोपीनाथ म्हाकले, महानंदा मयेकर, गौतमी कुबल, लता खोबरेकर, दुर्गा कुबल, जोस्ना कुबल, महेंद्र पालव, संजय गिरप, श्री. कुबल आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या वाटचालीनिमीत्त विशेष कार्यक्रम संपन्न…
