भाजपा कार्यकर्त्यांनी राबविला उपक्रम : पर्यटनस्थळ स्वच्छ ठेवण्याचा पर्यटकांना आवाहन..
⚡कणकवली ता.११-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोदी @12 अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज तरंदळे धरण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कणकवली तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित होत असलेल्या तरंदळे धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. या पर्यटनस्थळाची स्वच्छता राखण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपाध्यक्ष संदीप सावंत, कणकवली पंचायत समिती सदस्या संजना राणे, समीर प्रभुगावकर, महेश सावंत, तरंदळे सरपंच सुशील कदम, युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश दळवी, अभय गावकर, सुदर्शन नाईक, उपसरपंच शुभावली सावंत, बूथ अध्यक्ष संदेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुनीलदत्त जाधव, डॉ. सत्यवान राणे, राजाराम सावंत, गजानन सावंत, किरण सामंत, यशवंत इकाळे, संतोष कदम, बाजी सावंत, वेदान कदम, भीमसेन दळवी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाद्वारे धरण परिसरातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच पर्यटकांनीही पर्यटनस्थळांची स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. :::
