पर्यटनस्थळावरील फुटपाथ काम बोगस पद्धतीने सुरू…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा आरोप:मोती तलाव परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता…

⚡सावंतवाडी ता.११-: शहरात सुरु असणारे फुटपाथच काम बोगस पद्धतीने सुरु असून सेल्फी पॉईंटसमोरील परिसर कॉक्रीटीकरण न करता आहे तसेच पेवर ब्लॉग्स बसविण्यात आलेत. तर संस्थानकालीन तलावाशी जोडल्या गेलेल्या मुशीत असणारे सिमेंटचे पाईप ठेकेदाराने फोडले असून त्यावर निकृष्ट दर्जाच्या पातळ फरशा बसविण्यात येत आहेत. पुढील २५ वर्ष हा फुटपाथ टिकला पाहिजे तर हे काम नियमाप्रमाणे होणे आवश्यक आहे. मात्र, पर्यटनाचा केंद्र बिंदू असणाऱ्या कामाच्या ठिकाणी न.प. बांधकाम विभाग, मुख्याधिकारी आणि प्रशासनाचा दुर्लक्ष झाल्याचा आरोप नगरसेवक श्री.देव्या सुर्याजी यांनी केला आहे.

नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी हे काम चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचा आरोप केला आहे. बांधकाम अधिकारी, नगरपरिषद प्रशासनाकडून याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल‌ आहे. पर्यटनाचा केंद्र बिंदू असणाऱ्या कामाच्या ठिकाणी तरी मुख्याधिकारी यांनी लक्ष देणं आवश्यक होते. मात्र, हे काम बोगस पद्धतीने होत असल्याच मत त्यांनी व्यक्त केल आहे. तसेच ऐतिहासिक मोती तलावात संस्थानकालीन जुन्या मोऱ्यातून पावसाचे पाणी जाण्यासाठी असणारे पाईप ठेकेदाराकडून फोडण्यात आलेत. यातील काही भाग हा दगडी कठड्यात असल्याने तो तसाच आहे. पावसाच पाणी मुख्य रस्त्यावर साचू नये यासाठी ही योजना जुन्या लोकांनी केली होती. मात्र, या मोऱ्यातील सिमेंटचे पाईप फोडल्याने व अर्धवट स्थितीत ठेवल्याने पाण्यासोबत जाणारा कचरा आतमध्ये अडकणार आहे. तसेच फरशा देखील निकृष्ट दर्जाच्या पातळ असून त्यावर क्रॉक्रीट व पेवर ब्लॉग्स बसविण्यात येणार आहेत या सर्व मटेरिअल चे वजन होऊन फरश्या देखील फुटून या मोऱ्या तुंबल्यास फुटपाथ पुन्हा उघडावा लागेल. याबाबत नगरपरिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शहरातील मोती तलाव परिसरात पाणी साचण्याची शक्यता असून लोक निधी चा गैरवापर करणारे न.प.प्रशासन चा निषेध करुन कंत्राटदाराने योग्य रितीने काम न‌ केल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे.

You cannot copy content of this page