वेंगुर्ला मठ गावातील काम पुन्हा एकदा संथगतीने…

अजित नाईक :दोन्ही विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मठ गावाचे सौंदर्य बिघडतेय.

⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यात गेल्या तीन दिवसात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य रस्ता नजीकचे काम संथगतीने सुरु असल्याने भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांनी संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. बुधवारी शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाला. दरम्यान वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मार्गानजिक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साईडपट्टीसाठी दगड फोडणे व इतर काम तसेच रोलिंगचे काम बुधवारी सुरु होते.पुन्हा सलग दोन दिवस हे काम माती नसल्याचे कारण सांगून बंद ठेवण्यात आले आहे.
मठ मुख्य रस्ता वरील “झाडी कटिंगचा दिखावा” करून संबंधित विभागाने झाडी गटारात टाकली असून यामुळे अचानक पाऊस झाल्यास दूषित पाणी वेंगुर्ला सावंतवाडी या मुख्य मार्गांवर येणार आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने हे काम हाती घ्यावे, अशी मागणी अजित नाईक यांनी केली आहे. अंडरग्राउंड विजवाहिन्यांच्या कामाबाबत भाजपचे पदाधिकारी अजित नाईक यांनी अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता हे काम होणे आवश्यक आहे. मठ टाकयेवाडी, मठ मठकरवाडी, मठ कुडाळतिठा आदी ठिकाणी हे काम कधी पूर्ण करणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. मठ कुडाळतिठा येथे याच अपुऱ्या कामामुळे गटार तुंबून मुख्य वळणावर अपघात होण्याची स्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम चांगले केले असले तरी ” मिरगाक पावस ” सुरु झाल्यास काहीअंशी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान
मठ ठाकूरवाडी – बोवलेकरवाडी वळणावर वाहून आलेली माती, दगड धोकादायक ठरणार आहेत. मठ ठाकूरवाडी वळणावर जुने दगड साईडपट्टीवर धोकादायक आहेत. मठ मुख्य रस्ता वरील झाडी कटिंगचा दिखावा करून संबंधित विभागाने सर्व झाडी गटारात टाकली असून ही उचणण्याची जबाबदारी कोणाची? मुख्य मार्गांनजिक तुटलेले विद्युत पोल, स्ट्रीटलाईट्स पोल उचलण्याची जबाबदारी कोणाची ? मुख्य मार्गांनजिक कामावेळी तुटलेले किमीदर्शक फलक कधी पूर्ववत करणार? “मठ ठाकूरवाडी वळणावर धोकादायक झाडी” तोडण्याची जबाबदारी कोणाची? आदी अनेक सवाल वाहधारकातून उपस्थित करण्यात आले आहेत. सदर धोकादायक बाबीकडे भाजपा पदाधिकारी अजित नाईक विद्युत व सार्वजनिक बांधकाम आधीकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का? असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.याच मार्गांनजिक वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी
वेंगुर्ला शहरात तसेच भटवाडी कार्यक्षेत्रात मात्र गटार स्वच्छता व आवश्यक गटार उपसा मोहीम प्रभावीपणे सुरु ठेवली आहे. त्यामुळे
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मठ गावाचे सौंदर्य बिघडतेय, असा सूर व्यक्त करण्यात आला आहे.वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांवर अपघात होऊ नयेत या दृष्टीने दोन्ही विभागानी गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page