⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथे जुन्या सार्वजनिक विहिरीत पाणी उपलब्धता आहे. सद्या पावसाळा हंगाम सुरु न झाल्याने व पाण्याची खोली खाली गेल्याने नळपाणी योजना बंद आहे. तरी जुन्या विहिरीवरून रहाटाद्वारे पाणी नागरिकांना उपलब्ध होत आहे. दरम्यान येथील वाडीतील दुसऱ्या सार्वजनिक विहिरीचे शासनामार्फत उर्वरित काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकाना पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी पावसाळा हंगाम लांबल्यास अथवा काहीअंशी अथवा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायत मार्फत संबंधित वाडीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास ग्रामपंचायत सक्षम आहे, असे मत आडेली ग्रामपंचायत सरपंच यशस्वी विष्णू कोंडसकर यांनी बोलताना सांगितले. दरम्यान आडेली ग्रामपंचायत मध्ये आडेली आंबेडकरनगर कार्यक्षेत्रात पाणीटंचाई असल्याबाबत अद्यापपर्यंत कोणताही अर्ज अथवा तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहू लागू नये याची दक्षता निश्चितच घेण्यात येईल, असे यावेळी बोलताना यशस्वी कोंडसकर यांनी सांगितले.
आडेली आंबेडकरनगर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना करण्यात येईल : सौ. यशस्वी कोंडसकर…
