बदलापूर वार्ड क्रमांक २१ मधील विजयी नगरसेविका दुर्वा राणे यांचा कणकवलीत सत्कार…

⚡कणकवली ता.२५-: बदलापूर वार्ड क्रमांक २१ मधून नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या दुर्वा गणेश राणे यांचा सत्कार समारंभ सोमवारी शिवसेना शाखा कणकवली येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड-कणकवली-वैभववाडी विधानसभा प्रमुख संदेश पटेल तसेच समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांच्या हस्ते दुर्वा राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कणकवली तालुकाप्रमुख दामोदर सावंत, पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, उपजिल्हाप्रमुख सरीता राऊत, देवयानी एकावडे, जाणवली विभागप्रमुख सत्यवान राणे, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शहर प्रमुख तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी दुर्वा राणे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन व आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख दामू सावंत यांनी केले होते.

You cannot copy content of this page