वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची घटनास्थळी तातडीने भेट..
⚡वेंगुर्ला ता.२४-: रविवारी 24 मे रोजी पहाटे 4 वा. अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा – केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट बुडाली आहे . यात केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीमालक प्रकाश राघोबा सारंग व त्यांचा मुलगा राघोबा प्रकाश सारंग यांना वाचवण्यात दुसऱ्या होडीला यश आले आहे. शिरोडा केरवाडी येथून नेहमीप्रमाणे एकाच कुटुंबातील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी व त्यांचा भाऊ राजन सारंग हे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी पहाटे अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली. यात प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा बोटीवर असणाऱ्या ऑइल टँकर मध्ये राहिले. यानंतर त्यांना वाचवण्यात दुसऱ्या बोटीला यश आले. मात्र राजन सारंग हे समुद्रात बुडाले आहेत.दुपारी 1.45 वा.
मत्स्यविभागामार्फत शिरोडा येथील बेपत्ताचा ड्रोनद्वारे शोध सुरु करण्यात आला आहे.केरवाडी मच्छिमार सीसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी माहिती मिळताच वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी तायडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी नायब तहसीलदार राजन गवस, मंडळ अधिकारी निलेश मयेकर, कोतवाल निलेश परब, तसेच वेंगुर्ला पोलीस रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, भाजपचे पदाधिकारी कमलेश गावडे,शंकर घाटवळ, कौशिक परब,बहुसंख्य ग्रामस्थ, मच्छिमार आदी घटनास्थळी उपस्थित आहेत.बुडालेली होडी व जाळी महसूलमार्फत बाहेर काढण्यात आली आहे.
