⚡वेंगुर्ला ता.२३-: बुधवार दि. २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद साजरा होणार आहे. हा उत्सव शांततेत संपन्न व्हावा, सण कालावधीत शांतता सुव्यवस्था राखावी. मुस्लीम समाजाने तो निर्भय वातावरणांत साजरा करावा. यादृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांच्या सुचनेनुसार शहर बाजारपेठ ते मुस्लीम वस्ती व मस्जिद असलेल्या भागात वेंगुर्ला पोलीस स्टेशनमार्फत दंगा-काबू पथकाकडे असणाऱ्या साहित्यसमवेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड या अधिकाऱ्यांच्या प्रमुख सहभागांत वेगुर्ले पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी या संचलनात सहभाग घेतला.
वेंगुर्ला शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन…
