कोरोना काम करणाऱ्या शिक्षकाना लसीचे नियोजन करा

सीईओ नायर यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी ता २८-: फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोणा काळात काम करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पहिला व दुसरा डोस देण्याबाबतचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तात्काळ करावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी तालुका गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना लसींचा डोस द्यावा. अशी मागणी विविध शिक्षक संघटनानी शिक्षण सभापती अनिशा दळवी यांच्याकडे केली होती, सातत्याने होणार्‍या या मागणीबाबत शिक्षण सभापती अनिषा दळवी यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेऊन कोरोणा काळात फ्रंटलाईन काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना कोवीड प्रतिबंधात्मक लस चा पहिला, दुसरा डोस देणेबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेत केली यावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सभापती दळवी यांची मागणी मान्य करत आपल्याकडेही अशी मागणी बाबतची निवेदने आली होती व शिक्षक संघटनांशी चर्चा झाल्याचे सांगत तातडीने तालुका गटशिक्षणाधिकारी,वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण करणे बाबत नियोजन करावे. तालुकास्तरावर प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना कोविड कामकाजासाठी नियुक्त केले आहे त्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा डोस देणेबाबत ग्रामीण रुग्णालय ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र स्तरावर योग्य नियोजन करणे बाबत आदेश दिले आहेत. जे शिक्षक १८ ते ४४ वयोगटातील आहेत. त्यांची मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करावी. असे सूचित केले आहे.त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने गेले अनेक महिने कोविड काळात फ्रंटलाईन काम केलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

You cannot copy content of this page