जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन सभेत निर्णय
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडील महिला सबलीकरण योजने अंतर्गत महिला बचतगटांसाठी देण्यात येणाऱ्या शेळीगट लाभ योजनेत बदल करीत आता याचा लाभ सर्वसाधारण गटासाठी खुली करण्यात आली आहे. योजनेसाठी लाभार्थी उत्पन्न मर्यादा ३० हजारावरुन ८० हजार करण्यात आली आहे. तसेच शेळी व बोकड अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली आहे. सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन व दुग्ध विकास समितिची मासिक सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, सदस्य अनुप्रिती खोचरे, रोहिणी गावडे, मनस्वी घारे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, जिल्हा परिषद माजी सदस्य समीर नाईक, विनायक अण्णा राऊळ महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
