काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांचे लाभले सहकार्य_
*💫सावंतवाडी दि.२७-:* आज सावंतवाडीत ४.३० ते ६.३० दरम्यान नगरपालिकेच्या संकुलाच्या कोपऱ्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांची तसेच रिक्षावाले असे मिळून २५ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यापैकी सर्व निगेटिव्ह आले. यायेळी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉक्टर उमेश मसूरकर बीडीओ सावंतवाडी , नगरपालिका कर्मचारी शेख मॅडम, बांदेकर, शुभम गवळी व दिनेश भोसले आदी उपस्थित होते. उद्यापासून अशाप्रकारे सकाळी ११ ते दुपारी १ टेस्ट घेण्यात येणार आहे. उद्या या चाचण्या शंभर ते दीडशे घेण्यात येतील, असे डॉक्टर उमेश मसूरकर यांनी सांगितले.
