उद्योजक अनिल साधे, मकरंद सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

कणकवली नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर ला 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर प्रदान;नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 10 ऑक्सिजन बेड उपलब्ध_

कणकवली : उदयोजक अनिल सेधा, आणि मकरंद सावंत यांनी कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली. कणकवली नगरपंचायत च्या 25 बेड च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये आता 10 ऑक्सिजन बेडची मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे. कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा दिली जात आहे. त्यांच्या आरोग्यासोबतच मानसिक बळ वाढविण्यासाठी योगा, ध्यानधारणा सारखे उपक्रम राबविले जात आहेत. नगरपंचायत च्या वतीने रुग्णांना दिली जात असलेली दर्जेदार सुविधा लक्षात घेत रुग्णांना आणखी सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने उद्योजक अनिल सेधा आणि मकरंद सावंत यांनी 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटरला भेट दिले. जि.प.माजी उपाध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे हे कॉन्स्ट्रेटर सुपूर्त करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, गटनेता संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभि मुसळे, नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, स्वप्नील चिंदरकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page