पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.२७-:* तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाधित कुटुंबासाठी मदत जाहीर केली असून, कोकणसाठी ४५२ कोटी तर सिंधुदुर्गसाठी साडे ४० कोटीची आर्थिक मदत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ही नुकसान भरपाई केवळ बाधित कुटुंबांसाठी जाहीर करण्यात आली असून, शासकीय मालमत्तेची झालेले नुकसान शासनाकडून त्या त्या विभागाला देण्यात येणार आहे. तसेच किनारपट्टी भागातील शाळा, महाविद्यालय यांचे झालेले नुकसान विद्यापीठ आणि शासनाच्या आपत्कालीन निधीतून मदत केली जाणार आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ऍप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
