*निगुडे सरपंच समीर गावडे यांच्याकडे थर्मल गन आणि ऑक्सीमिटर केले सुपूर्द*
*💫बांदा दि.२७-:* ग्रामपंचायत, निगुडे यांना वाढत्या कोराना विषयी आरोग्याची काळजी घेण्याकरता सावंतवाडी मंडळ अधिकारी तथा निगुडे गावचे सुपुत्र श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी निगुडे सरपंच श्री. समीर गावडे यांना थरमलगन, ऑक्सिमिटर सुपूर्त केला. गावाच्या विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगा आम्ही काहीना काही मदत ग्रामपंचायतीला अवश्य करू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिले ग्रामपंचायतीचे कार्य अतिशय चांगले असून विकासाच्या बाबतीत अनेक योजना येतात या आपण जनतेपर्यंत पोहोचवा असे मार्गदर्शन सरपंच यांना केले गावाच्या हितासाठी जे काय सहकार्य करायचं असेल ते आम्ही अवश्य करू यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामसेवक तनवी गवस, तलाठी श्रीमती भाग्यलक्ष्मी शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते
