कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार…

२८ एप्रिलला मतदान ; ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज..

कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीअंतर्गत तळेरे, दारिस्ते व घोणसरी येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये कासार्डे प्रभाग २ मधून शितल शेट्ये, कळसुली प्रभाग ३ मधून प्रांजल घाडीगावकर, पिसेकामते प्रभाग ३ मधून देवेंद्र सावंत, हुंबरठ प्रभाग १ मधून मनिषा जाधव, हळवल प्रभाग ३ मधून गौरी परब, तळेरे प्रभाग १ मधून निलम वाडये, तळेरे प्रभाग २ मधून प्राची चव्हाण, डामरे प्रभाग १ मधून भाग्यश्री सावंत, कलमठ प्रभाग ३ मधून मृण्मयी जाधव, आयनल प्रभाग १ मधून अशोक मगम व वारगाव प्रभाग १ मधून महेंद्र केसरकर यांचा समावेश आहे.

दारिस्ते ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रीती कदम, सिद्धी गुरव व पूजा गुरव यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सिद्धी गुरव यांनी अर्ज मागे घेतल्याने आता प्रीती कदम व पूजा गुरव यांच्यात लढत होणार आहे.

तळेरे ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी सागर डंबे, उद्धव महाडिक व आदित्य महाडिक यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी उद्धव महाडिक यांनी माघार घेतल्याने सागर डंबे व आदित्य महाडिक यांच्यात सामना रंगणार आहे.

साकेडी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी ऋतुजा सदडेकर व साक्षी घाडी यांनी अर्ज भरले होते. ऋतुजा सदडेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने साक्षी घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

घोणसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी राजेंद्र राणे, अनंत गुरव व प्रसाद राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी राजेंद्र राणे यांनी अर्ज मागे घेतल्याने अनंत गुरव व प्रसाद राणे यांच्यात थेट लढत होणार आहे.

तालुक्यातील या तीन ठिकाणी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

You cannot copy content of this page