संजू परब यांनी सेना स्टाईलने एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना दाखवला हिसका…

शांत असलेल्या सावंतवाडीकरांचा अंत पाहू नका: अधिकाऱ्यांना दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.१७-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सेना स्टाईलने एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना हिसका दाखवला. सायंकाळनंतर देखील काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने श्री. परब प्रचंड आक्रमक झाले. सेना स्टाईलने त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले.

तर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन करत रात्रीच काम करण्याची परवानगी दिलीय का ? असा सवाल केला. तसेच रहदारीच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असताना सायंकाळ नंतरही काम सुरू असल्याने श्री. परब आक्रमक झाले. त्यांनी उपस्थित महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना सेना स्टाईल दाखवून दिली. दरम्यान, शहरातील नागरिकांनी त्रास होत आहे. लोकांना धूळ खावी लागत आहे. रोलर देखील फिरवले जात नसल्याने तात्काळ कार्यवाही करा. अन्यथा, शांत असलेल्या सावंतवाडीकरांचा अंत पाहू नका असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे सत्यवान बांदेकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page