सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनविभागाची ‘दबंग’ कामगिरी..
⚡वेंगुर्ला ता.१७-: वनविभागाच्या वतीने
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे गुरुवारी रात्री दिमाखदार कारवाई करताना 9.120 कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करीत 4 संशयिताना ताब्यात घेतले होते. दरम्यान संबंधित चारही संशयिताना
सावंतवाडी
वनक्षेत्रपाल फिरते पथक यांनी आज शुक्रवारी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदरचे अंबरग्रीस /ब्ल्यू व्हेल माशाची उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सात कोटीहुन अधिक किमत असल्याची माहिती समोर येत आहे.
