कणकवलीत उद्या दिव्यांग व पेन्शन धारकांसाठी विशेष शिबिर…

शिबिरात मिळणार पेंशन धारकांना उत्पन्नाचे दाखले..

⚡कणकवली ता.१६-:
दिव्यांग व्यक्ती तसेच विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हयात दाखला भरणे आणि उत्पन्न दाखले काढून देण्यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात उद्या (१७ एप्रिल) रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींसह इतर पेंशन लाभार्थ्यांचे उत्पन्न दाखले तयार करून दिले जाणार आहेत. त्यामुळे संबंधितांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शिबिरास येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, लाईट बिल, (असल्यास) रहिवासी दाखला, घरपत्रक उतारा, UDID कार्ड किंवा प्रमाणपत्र, तसेच ७/१२ मध्ये नाव असल्यास ७/१२ व ८अ उतारा ( सर्व कागदपत्रांची झेरॉक्स) ही कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.

लाभार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दिक्षांत देशपांडे व एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सचिन सादये ९८६०७१८९४९ यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page