माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१६-: तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,
तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी , तंटा मुक्ती अध्यक्ष प्रविण केरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शुभारंभी प्रसंगी देवी माऊली मंदिरात श्रीफळ ठेवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते तलावात श्रीफळ अर्पण करण्यात आले.
देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव असून या तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे होते. या तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण होणे अत्यंत गरजेचे होते ,यासाठी माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री प्रविणभाई भोंसले, माजी आमदार शामभाई सावंत ,सुरेंद्र भोसले , नामदेव केरकर ,उमेश सावंत, विश्वनाथ आडारकर यांनी हा निधी मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली
या तलावामुळे सौंदर्यात अजून भर पडत आहे.
५० लाख रुपयांचे हे काम मंजूर असून या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने, गावातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमावेळी तिरोडा ग्रामविकास मंडळाचे सदस्य तसेच सत्यवान आडारकर,शरद गोडकर,विलास सावंत,महेश्वर केरकर,पंढरी सावंत,रघुनाथ आडारकर,गंगाराम केरकर,काशिनाथ गोडकर , बाबल शेणइ,काशिनाथ तिरोडकर,उत्तम गावडे, अनिल केरकर,ठेकदार मच्छिंद्र तांडेल ,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page