कुडाळ मध्ये आरोग्य आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या आरोग्य शिबिराला आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले या शिबिराला प्रतिसाद मिळाला यावे यावेळी आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर व संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, देवेंद्र नाईक, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, आफरीन करोल, श्रेया गवंडे, अक्षता खटावकर, ज्योती जळवी, सई काळप, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, अश्विनी गावडे, साक्षी सावंत, रेवती राणे, रेखा काणेकर, शिल्पा घुर्ये, विशाखा कुलकर्णी, अक्षता कुडाळकर, बंड्या सावंत, राकेश कांदे, चेतन पडते, आबा धडाम, चंदन कांबळी, प्रथमेश केळबाईकर, राजाराम गडेकर, प्रथमेश कांबळी, योगेश काळप आदी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामध्ये १९० जणांनी नेत्र तपासणी, १०० जणांनी रक्त तपासणी, ७६ जणांनी इसीजी तपासणी केली. तर रक्तदान ७५ जणांनी केले.

You cannot copy content of this page