⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आज राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तालुक्यातील युवक- युवतींच्या वाढत्या आत्महत्या बघता हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यात आज ही घटना घडली. ही मुलगी अल्पवयीन असून राहत्या घरी गळफास घेत तिने आत्महत्या केली. तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. एकुलत्या एका मुलीनं आत्महत्या केल्याने कुटुंबियांनी आक्रोश केला.
