दाभोली येथे घरात शिरलेल्या बिबट्यास जेरबंद…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथील विवेक गुरुनाथ जोशी यांच्या स्वयंपाकघरात आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चक्क बिबट्या शिरल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यावर वनविभागाने बिबट्यास सुरक्षितरित्या रेस्कयू करण्यात यश मिळविले. यावेळी वनविभाग चे वनपाल सावळा कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी पथक या मोहिमेत सहभागी झाले होते.यावेळी सरपंच उदय गोवेकर, पोलीसपाटील जनार्दन पेडणेकर,किशोर बांदवलकर, अण्णा जोशी, सुरेश गोवेकर, उमेश जोशी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page