⚡सावंतवाडी ता.०६-: नेताजी सुभाष बोस आयएनए ट्रस्टच्या वतीने, राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल त्यांच्या अधिकृत शपथविधी सोहळ्यापूर्वी, त्यांचे नवी दिल्ली येथे जाऊन खास ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .
यावेळी ट्रस्टच्या चालू असलेल्या उपक्रमांविषयी आणि देशभक्तीपर कार्याविषयी त्यांना माहिती देण्यात आली.
अत्यंत अभिमानाच्या क्षणी, शरद पवार यांना यावेळी प्रतिष्ठित आयएनए टोपी सुद्धा प्रदान करण्यात आली तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीचे नेतृत्व ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर. एस. छिकारा यांनी केले, त्यांच्यासोबत सचिव निधी कुमार ,सुरेंद्र भोसले उपस्थित होते.
नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीचा वारसा जपण्याच्या ट्रस्टच्या वचनबद्धतेवर यावेळी चर्चा करण्यात आली तसेच भविष्यातील प्रयत्नांविषयी खासदार शरदचंद्र पवार यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार जाणून घेण्यात आले.
