अध्यक्ष पदी गजानन काकतकर तर उपाध्यक्षपदी दिनानाथ काळोजी..
⚡सावंतवाडी ता.०६-: लोक कल्याण शिक्षण संस्था मुंबई संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव प्रशालेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शासन परिपत्रकानुसार”माजी विद्यार्थी संघ” स्थापन करण्यात आला.
प्रशालेच्या प्रगती साठी महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांचे नाते संबंध दृढ होऊन, अनुभव ,मार्गदर्शन व सहकार्याचा सुंदर संगम घडावा यासाठी विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रशालेची “माजी विद्यार्थी संघ समिती” स्थापन करण्यात आली.
यात अध्यक्ष म्हणून गजानन काकतकर,उपाध्यक्ष दिनानाथ काळोजी,सचिव उत्तम भागीत,सहसचिव बाळकृष्ण हळदणकर,कोषाध्यक्ष प्रमोद पांढरे ,सल्लागार म्हणून अण्णा झांट्ये, सुरेंद्र भोसले, विलासानंद मठकर गुरुजी,स्नेहा मुळीक,शंकर साटेलकर व प्रशालेचे शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नूतन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी विद्यार्थी सुरेंद्र भोसले याच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कै.भाईसाहेब राजाध्यक्ष,गुरुवर्य (कै) रा.गो.सामंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी सुरेंद्र भोसले,शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये,शिक्षक पालक उपाध्यक्ष दिव्या काळोजी,मुख्याध्यापक उत्तम भागीत,धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक,युवा सेनेचे सागर नाणोसकर,तिरोडा माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, डीएड कॉलेज प्राचार्य अमृतराव माळगे,बाळकृष्ण हळदणकर,गजानन काकतकर, पोलीस पाटील श्रीम.पोखरे,महेश आरोसकर,दिनानाथ काळोजी, सचिन मुळीक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी करत ,शासन परिपत्रकाबाबत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित माजी विद्यार्थी सुरेंद्र भोसले यांनी शाळेच्या प्रगतीसाठी हितासाठी सर्वोपतरी मदत करू असे आश्वासन देत नूतन माजी विद्यार्थी संघ नियुक्तीतील सर्व सदस्यानां शुभेच्छा देत प्रशालेच्या प्रगतीसाठी , शैक्षणिक दर्जा,गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले.
मान्यवरांपैकी अण्णा झांट्ये, माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर ,प्रदीप काकतकर,विद्याधर पाटणकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
सूत्रसंचालन मानसी परुळेकर तर आभार काव्या साळवी यांनी केले.यावेळी माजी विद्यार्थी,प्रशालेचे शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
