जिल्ह्यातील कार्यरत गिर्यारोहक सारख्या संघटनांशी समन्वय नाही;भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पाटील यांचा आरोप
💫 *कुडाळ*:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कुचकामी असल्याचे कालच्या तौक्ते चक्रीवादळात पुन्हा एकदा दिसून आले असून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला कलेसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिर्यारोहक संघटनेपासून आपत्ती व्यवस्थापनात कितीतरी युवक आणि संघटना काम करतात परंतु जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेकडून कोणताही कायमस्वरूपी समन्वय या युवकांची व संघटनांशी राखला जात नाही. मदतीसाठी परजिल्ह्यातील संस्थांना बिदागी देऊन पाचारण केले जाते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना गृहीत धरून फुकट राबवणे हे आता कुठेतरी थांबवावे लागणार आहे. मागील काही वर्षातील खर्चाचे ऑडिट आम्हाला मागून त्याप्रमाणे वस्तुस्थिती पहावी लागेल, असा इशाराही भाजपा युवा मोर्चा सोशल मिडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील यांनी दिला आहे. तोक्ते वादळानंतर दहा दहा दिवस जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज पोहोचत नाही, पाण्यासाठी तळमळण्याची वेळ येणे, अन्नधान्य आणि निवाऱ्यावाचून जनता वंचित राहणे हे प्रशासनाचे यश नव्हे. व्यवस्थापन यंत्रणा भविष्यात आणखीही नैसर्गिक संकटे येणार असल्याचा इशारा आधीच देण्यात आलेला आहे. अशा प्रसंगी आपत्ती निवारण यंत्रणेने योग्य आढावा घेतला तरच प्रशासनाला देखील मदत होणार आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती निवारण यंत्रणेतली मरगळ व बेपर्वाही झटकून ही यंत्रणा सर्व मार्गांनी सक्षम करणे, स्वयंसेवी संस्थांचे त्याकामी योग्य सहकार्य घेणे आदी गोष्टी गरजेच्या आहेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील यांनी केली आहे.
