कणकवली तहसीलदार कार्यालयात १७ एप्रिल रोजी विशेष शिबिर

..

दिव्यांग व पेंशन लाभार्थ्यांसाठी उत्पन्न व हयात दाखल्यांची सोय:जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन..

⚡कणकवली ता.०६-: दिव्यांग व्यक्ती तसेच विविध शासकीय योजनांचे पेंशन लाभार्थी यांना आवश्यक असलेले उत्पन्न दाखला व हयात दाखला सहज आणि जलद मिळावा यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात (दि.) १७ एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कणकवली तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित राहणार असून, लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्वरित सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फिरावे लागणार नाही, अशी सुविधा या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती तसेच पेंशन लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दिव्यांग नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्यानंतर या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरास येताना लाभार्थ्यांनी आधारकार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, दिव्यांग UDID कार्ड व प्रमाणपत्र, घरपत्रक उतारा, बँक पासबुक (शेतकऱ्यांसाठी), तलाठी अहवाल, ७/१२ उतारा व ८-अ उतारा यांच्या झेरॉक्स प्रती व मूळप्रत सोबत आणाव्यात, असेही प्रशासनाने कळविले आहे.

या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना आवश्यक दाखले मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

You cannot copy content of this page