परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी–वेंगुर्ल्यात पाच दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०६-: शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जी जी उपरकर यांचा वाढदिवस 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्ताने पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच दिवसीय विविध कार्यक्रम पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी वेंगुर्ला येथे राबविण्यात येणार आहेत.यात दरवर्षीप्रमाणे माजी आमदार उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व मुलांसमवेत केक कापून साजरा करण्यात येणार तसेच माजी आमदार उपरकर चषक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन त्याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहे. तर आरोग्य केंद्रांमध्ये फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख (तथा) सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार व युवा पदाधिकारी आबा चिपकर यांनी दिली.

You cannot copy content of this page