⚡दोडामार्ग ता.०५-: येथील चव्हाटा मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा कोनशीला समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मोरगाव गावातील मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान चव्हाटा मंदिर सभागृह उभारणीमुळे गावातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
यावेळी जी. प. सदस्या सौ. साशी तळवडेकर, उपसभापती गणेशप्रसाद गवस, सरपंच संतोष आईर, दशरथ ठाकुर, शैलेश ठाकुर, संतोष ठाकुर, रमेश ठाकुर (सोसायटी चेअरमन), नदू गावकर, उदय ठाकुर, आप्पा कदम (उपसरपंच) तसेच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
