*💫बांदा दि.२३-:* दोडामार्ग एक्सप्रेस साहित्यिक मंच आयोजित राज्यस्तरीय बालकाव्य लेखन स्पर्धेत बांदा नं १ केंद्रशाळेच्या पूर्वा हेमंत मोर्ये या चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनीने राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली राहण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी बालकाव्य लेखन स्पर्धेचं व्यासपीठ दोडामार्ग एक्सप्रेस साहित्यिक मंच उपलब्ध करुन दिले होते. राज्यस्तरीय बालकाव्य लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्वा मोर्ये हिने मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक सरोज नाईक, सरपंच अक्रम खान ,शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय बालकाव्य लेखन स्पर्धेत बांदा शाळेच्या पूर्वा मोर्येचे यश…
