भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन..
*💫मालवण दि.२३-:* कोविड १९ चा जिल्ह्यात मोठा प्रभाव असल्याने सामाजिक आरोग्य जपण्याच्यादृष्टीने दि २६ मे रोजी असणारी बुद्ध जयंती आपापल्या घरी साजरी करताना गावात बुद्ध विहार असल्यास फिजिकल डिस्टन्स राखून साध्यापद्धतीने बुद्ध जयंती साजरी करावी असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा शाखा अध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा शाखा अध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की यावर्षी बुद्ध जयंती २६ मे रोजी येत असून कोव्हिड १९च्या प्रभावामुळे प्रत्येकाने बुद्ध जयंती घरच्या घरी साजरी करावी तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी.साथीचा प्रभाव वाढल्यामुळे अनेक गावात पेशंट सापडत आहेत त्यांना स्वताचे आरोग्य जपून काळजी घेऊन मदत करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या धम्माचे मूलतत्त्व बंधुता करूणा मैत्री आहे .यापूर्वी आपण सर्वांनी गरजूना मदत केली आहे यावेळीही आपण जवळपासच्या लोकांना मदत करावी. ही आपत्तीही अनित्य आहे ,नष्ट होणारी आहे असे नमूद केले आहे
