एस.पी.के. कॉलेजच्या छपराला लागली आग…

खाजगी पाण्याच्या टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रणात: घटनास्थळी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी धाव घेत केली पाहणी..

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी शहरातील एस पी के कॉलेजच्या छपराला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. दुपारच्या वेळेत ही आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच तातडीने खाजगी पाण्याच्या टँकरला पाचारण करण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने व टँकरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. .घटनास्थळी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

You cannot copy content of this page