माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी समस्या सोडविणार

फडणवीस यांचे संघटनेला आश्वासन संघटनेने वेधले निवेदनाद्वारे लक्ष

मालवण (प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून न्याय मिळवून देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने ते प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, ऍड. चेतन पाटील, आम.नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प.अध्यक्ष संजना सावंत आदी पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे, श्याम पाताडे, रुपेश खोबरेकर, शाबी तुळसकर , आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माध्यमिक ,उच्च माध्यमिक, व अध्यापक विद्यालयातील काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रकारच्या समस्या असून मासिक वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ येते. मासिक वेतन दोन तारखे पर्यंत व्हावे, सातवा वेतन आयोग अंतर्गत मंजूर केलेली आश्र्वासित प्रगती योजनेची ,१०,२०,३० योजनेची कार्यवाही लवकर सुरू करावी, दि.१३/१०/२०१३ च्य शासन निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई येथे दावा दाखल असून अंतिम निर्णय होईपर्यंत समायोजन प्रक्रिया थांबवावी, शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू करावी, चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबत रुपये ५००० चया ठोक मानधनावर शासनाने काढलेला आदेश रद्द करावा व पूर्ण वेतन भत्ते इतर लाभ देऊन कर्मचारी भरती सुरू करावी,शिक्षकेतर यांच्या पदोन्नतीस मान्यता मिळावी, वेतन पथक कार्यालय सिंधुदुर्ग येथे गेल्या तीन- चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात थकित वेतन देयके, वैद्यकीय देयके, फरक बिल, वरिष्ठ श्रेणी फरक बिल, रजा कालावधी देयके, रजा विक्री देयके व इतर देयके अद्याप मंजूर न झाल्याने प्रलंबित आहेत त्यामुळे सदर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याबाबत लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. फोटो: देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page