बालदशावतार नाट्यप्रयोगाने रंगला जि. प . शाळा मठ कणकेवाडी नं.३ चा सांस्कृतिक सोहळा…

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्हा परिषद मठ कणकेवाडी नं.३ शाळेत आयोजित करण्यात आलेला वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपारिक दशावतार नाट्यप्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्कार, गीत, एकपात्री अभिनय तसेच सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले “वैष्णव उद्धार” हे दशावतारी नाटक विशेष लक्षवेधी ठरले.नाटकाचं लेखन व दिग्दर्शन शिक्षक रामा पोळजी यांनी केले.विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनय, वेशभूषा व संवादफेकीमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमास मठ ग्रामपंचायतच्या सरपंचा रुपाली नाईक ध्यक्षस्थानी होत्या,वेंगुर्ला पंचायत समितीचे नूतन सदस्य नितीन मांजरेकर सर,हे प्रमुख पाहुणे होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदेश राणे उपाध्यक्ष अवीन गावडे पालक सचिव ऋतुजा परब, शंकर गावडे,पत्रकार के.जी.गावडे ,जयश्री सकपाळ, मानसी भगत, उमेश धुरी, महेश धुरी, संतोष वायंगणकर, अजित नाईक, नामदेव सावंत,रामचंद्र परब, बुधाजी परब,योगेश गावडे, देऊ परब,प्रशांत परब, दत्तप्रसाद कावले, साईल परब, मनिष परब,मुख्याध्यापक वीरधवल परब सर,शिक्षक रामा पोळजी, प्रकाश भोई, राजश्री घोरपडे, अंगणवाडी सेविका श्रीम. परब मॅडम,बरेच ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page