कु. रणवीर सिंगयांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी…

प्रसन्ना देसाई:वेंगुर्ला येथे हिंदू धर्माभिमानी मंडळाच्या वतीने विशेष सत्कार..

⚡वेंगुर्ला ता.२७-: उत्तराखंड ते महाराष्ट्रातील ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्याचे स्वप्न बाळगणारे कु.रणवीर ( कार्तिक ) सिंग हे आज वेंगुर्ला तालुक्यात (जि. सिंधुदुर्ग ) दाखल झाले होते.त्यांचा आज शुक्रवारी सायंकाळी वेंगुर्ला माणिकचौक येथील शिवाजी महाराज पुतळासमोर हिंदूधर्माभिमानी मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.उत्तराखंड ते महाराष्ट्रातील तब्बल ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्याचं ध्येय बाळगणारे कुमार रणवीर उर्फ कार्तिक सिंग हे आज वेंगुर्ले येथे उपस्थित होते. त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात हिंदू धर्माभिमानी मंडळाच्या वतीने माणिक चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, मच्छिमार नेते दादा केळुसकर, ब्रम्हकुमारी च्या कोल्हापूर येथील पदाधिकारी, बाबुराव खवणेकर, अनिकेत ताम्हणकर, शिवप्रेमी संघटनेचे रोहित वेंगुर्लेकर – नितीश कुडतरकर – विनय गोगटे – प्रथमेश यंदे, विनोद लोणे, गडावरचे धारकरी, प्रज्वल कोयंडे, श्रीमती कोयंडे, श्री. पाडगावकर आदिसह हिंदूधर्माभिमानी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेट देण्याचा त्यांचा संकल्प हा आजच्या युवा पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी ठरतोय, अशी प्रतिक्रिया त्यांच्या सत्कारप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी उपस्थितानी प्रसन्ना देसाई यांच्या गेल्या 25 वर्षातील नियोजनात्मक समाजपयोगी – विधायक कार्याचा विशेष उल्लेख केला.

You cannot copy content of this page