सावंतवाडीतील वकिल ॲड. अलसुहेब डिंगणकर यांचे निधन..

वकिली क्षेत्रात व्यक्त होत आहे हळहळ

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसिद्ध वकील अलसुहेब सत्तार डिंगणकर (४८) यांचे आज अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर सुरु होते.।त्यातच आज सकाळी।त्यांची प्राणज्योत मालवली. गेली २४ वर्षे ते सावंतवाडीतील न्यायालयात वकिली करत होते. त्यांचे वडील ॲड. सत्तार डिंगणकर हे देखील वकील होते. ॲड. सुहेब हे अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावाचे होते. सावंतवाडी बार असोसिएशनच्या समितीत काही वर्ष त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. वकिली क्षेत्रात क्राईम वकील म्हणून त्याचा हातखंडा होता. लेदर क्रिकेट खेळाची त्यांना फार आवड होती. सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या क्रिकेट संघांचे ते अष्टपैलू खेळाडू होते. हा संघही चांगल्या प्रकारे त्यांनी तयार केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने सावंतवाडी तालुका बार असोसिएशनमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आम्ही मुकलो अशा शब्दात वकिल मित्रांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

You cannot copy content of this page