उद्या दिंडी-पालखी व महाप्रसाद आयोजन: भाविकांनी लाभ घेण्याचे सुभाष गावडे यांचे आवाहन…
⚡आंबोली ता.१०-: चौकूळ गावात पारंपरिक हरिनाम सप्ताह भक्तिभावात सुरू असून आज सप्ताहाचा सातवा दिवस आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुभाष गावडे यांनी केले आहे.
तर उद्या सप्ताहाची सांगता मुलाची दिंडी-पालखी तसेच महाप्रसाद कार्यक्रमाने होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.सदर कार्यक्रमांचा लाभ सर्व ग्रामस्थ व भाविकांनी घ्यावा, अशी विनंती श्री. सुभाष गावडे यांनी केली आहे.
