शिवाजी प्रागतिक स्कुलचीवेंगुर्ला पोलीस स्थानकास भेट…

⚡वेंगुर्ला ता.०६-: जिल्हा प्रशासनाच्या आदेशानव्ये वेंगुर्ला पोलीस स्थानकाच्या वतीने रेझिंग डे सप्ताह राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मंगळवारी शहरातील पी एम श्री शिवाजी प्रागतीक स्कुल कॅम्प वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांनी
वेंगुर्ला पोलीस स्थानकास भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वेंगुर्ला पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महिला पोलीस हवालदार दिपा मठकर, एस. एस. मुळीक यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे दैनंदिन कामकाज क्राईम, गोपनीय विभाग, लोकअपगार्ड, वाहतूक विभाग, तसेच शस्त्रविभाग, पोलिसांची कर्तव्य याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संगिता सावंत, उपशिक्षिका योगिता कोळसूळकर आदी शिक्षक उपस्थित होते.
तसेच रा. कृ. पाटकर हायस्कुल येथे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शस्त्रसंबंधित मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल सुविधा, वाहतूक व पोलिसांचे दैनंदिन कामकाज याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, भगवान चव्हाण, प्रथमेश पालकर, स्वप्नील तांबे, दिपा मठकर, जयेश सरमळकर, होमगार्ड तुषार मांजरेकर, निकु नांदोसकर, तसेच मुख्याध्यापक सुशांत धुरी, विलास गोसावी, मनीषा खरात, समिर पेडणेकर, सविता जाधव, समृद्धी पिळणकर, शांती गावडे आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा खरात व विलास गोसावी यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page