सौ. सिद्धाली गावडे:चौके ग्रामपंचायतीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी..
⚡मालवण ता.०३-: प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, यामुळेच आज महिला शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत, सावित्रीबाईंच्या या योगदानाची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ आशा स्वयंसेविका सौ. सिध्दाली संतोष गावडे यांनी चौके ग्रामपंचायतीमध्ये बोलताना व्यक्त केले.
चौके ग्रामपंचायत कार्यालयात
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच पी. के. चौकेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेताना सौ. सिध्दाली गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर, अंगणवाडी सेविका सौ. सुकाळी, लिपिक सौ. सुविधा गावडे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सुहासिनी परब, केंद्र संचालिका कु. मेघा वराडकर,ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सावंत, गुरुप्रसाद गावडे, विनित आंबेरकर, गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
